नवरीसाठी नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास
.… रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास.
ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
…. रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल.
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ
…. रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ.
जाईजुईचा वेल पस्ररला दाट
…. बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ.
लग्नात्त लागतात हार आणि तुरे
…. रावान्च नाव घेण्याचा आगृह आता पुरे.
सरिते वर ऊठतात तरंग,सागरा वर उठतात लाटा, …. च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा.
जशी आकाशात चंद्राची कोर ….. पती मिळायला माझे नशीब थोर.
आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
…. राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.
उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..
…. रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु.
आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर,
आयुष्याचा प्रवास करीन …. रावांच्या बरोबर.